"जी-20 हा भारतासाठी अभिमानास्पद क्षण" - शशी थरुर

10 Sep 2023 16:46:05
 G20
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी जी-२० शिखर परिषदेत जारी केलेल्या 'दिल्ली घोषणापत्रावर एकमत निर्माण केल्याबद्दल भारताचे जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांचे कौतुक केले. थरूर म्हणाले की जी-२० मध्ये भारतासाठी ही एक विशेष कामगिरी आणि अभिमानास्पद क्षण आहे.
एका मुलाखतीत अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन शशी थरूर यांनी रशिया-युक्रेनबाबत जी-२० देशांमध्ये एकमत निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिले की, शाब्बास अमिताभ कांत, तुमच्या आयएएस निवडीमुळे आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) ने एक उच्च मुत्सद्दी गमावला आहे.
 
जी-20 शिखर परिषदेच्या दिल्ली घोषणापत्रात भारताने रशियाचा उल्लेख न करता युक्रेन युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचे श्रेय भारताचे जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांना जाते. अमिताभ कांत यांच्या याच कामगिरीवर आनंदीत झालेल्या शशी थरुर यांनी अमिताभ कांत यांचे कौतुक केले.
 
 
Powered By Sangraha 9.0