कोल्हापूर : मराठी रंगभूमीला संगीत नाटकांचा अलौकिक वारसा आहे. अशात २१ व्या शतकात नव्या पिढीला संगीत नाटकाचे दर्शन घडवणारे नाटक म्हणजे 'संगीत देवबाभळी' रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. महत्वाची बाब म्हणजे 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा समावेश कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठातील बीए मराठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून करण्यात येणार आहे.
'संगीत देवबाभळी' नाटक रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांच्या पत्नी आवली यांच्यातील संवादांवर आधारलेले आहे. निर्माते प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनची निर्मीती असलेल्या या नाटकाचे लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. या नाटकाचा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर रोजी रसिकांसमोर सादर होणार असल्याचे घोषित करण्यात आले असून शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी या नाटकात प्रमुख पात्र रंगवली आहेत.