'आदित्य एल १' उरले काहीच तास...

01 Sep 2023 12:41:50



solar mission

मुंबई :
भारताच्या पहिल्या सौर मोहिमेला म्हणजेच 'आदित्य एल १' ला आता काहीच तास उरले आहेत. रॉकेटची लॉन्च रिहर्सल आणि इतर तपासणीसुद्धा बुधवारीच पूर्ण होऊन इस्रो प्रक्षेपणासाठी सज्ज झाले आहे.

उद्या सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल १चे प्रक्षेपण होणार आहे. इस्रो आपल्या आदित्य एल १ उपग्रहाला एल १ कक्षेत प्रस्थापित करणार आहे.

प्रक्षेपणानंतर या कक्षेपर्यंत पोहचण्याकरता यानाला पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर इतके अंतर पार करायचे आहे. यासाठी चार महिन्याचा कालावधी लागणार आहे.

चांद्रमोहिमेपेक्षा चार पटीने जास्त अंतर असलेल्या खडतर अशा इस्रोच्या या मोहिमेकडे आता भारतासह इतर ही देशांचे लक्ष लागले आहे.

Powered By Sangraha 9.0