मुंबई : भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, ग्रँडमास्टर प्रज्ञानंद याच्यासमवेत त्याचे कुटुंबीय आई, वडील हेदेखील उपस्थित होते. युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याच्या खेळीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी प्रज्ञानंदच्या कुटुंबीयांशीदेखील संवाद साधला.
पंतप्रधानांनी ट्विटवर पोस्ट करत प्रज्ञानंदसोबत भेट झाल्याची माहिती देतानाच ते म्हणाले, तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना भेटून आनंद झाला, तसेच, आपण उत्कटता आणि चिकाटी दर्शवितो. तुमचे उदाहरण दाखवते की भारताचे तरुण कोणतेही क्षेत्र कसे जिंकू शकतात. संपूर्ण देशाला तुझा अभिमान वाटतो!
दरम्यान, 'फिडे'च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पाचवेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज देत सामना टायब्रेकपर्यंत खेळवला गेला. परंतु, कार्लसनच्या आजवरच्या अनुभवाच्या जोरावर आणि प्रतिस्पर्ध्यावर दबाब टाकत खेळी करण्याची क्षमता याचा पुरेपूर सामना युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद केला.
दरम्यान, आर प्रज्ञानंदने आपल्या पोस्टमध्ये म्हटले केले की, पंतप्रधानांना भेटणे हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान होता. पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर त्यांनी मला आणि माझ्या पालकांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व शब्दांसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, असेही प्रज्ञानंदने म्हटले आहे.
रमेशबाबू प्रज्ञानंद याचा जन्म तामिळनाडूमधील त्याचे वडील रमेशबाबू टीएनएससी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. तर त्याची आई नागलक्ष्मी या गृहिणी आहेत. नागलक्ष्मी यांना बुध्दिबळ खेळाची आवड होती. त्याचा फायदा प्रज्ञानंद आणि त्याची मोठी बहीण आर वैशाली ही महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आहे. आपण पाहिले असेल तर प्रज्ञानंदची आई त्याच्यासोबत प्रत्येक सामन्यावेळी हजर असते.
आर. प्रज्ञानंद भारताचा लोकप्रिय आणि पहिला विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यानंतर एक बुद्धिबळातील प्रतिभावान. तो वयाच्या १० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर बनला, त्यावेळेस असे करणारा सर्वात तरुण बुध्दिबळपटू म्हणून प्रज्ञानंदचा उल्लेख केला जातो.तसेच, वयाच्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टर बनला, त्यावेळेस २२ फेब्रुवारी २०२२ रोजी, वयाच्या १६ व्या वर्षी तत्कालीन जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला हरवणारा सर्वात तरुण खेळाडू बनला,
आर. प्रज्ञानंदने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांस नमविले आहे. यात फाबियानो कारुआना, मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, डिंग लिरेन यांच्यासोबत त्याने लढती खेळल्या आहेत. 'फिडे'च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामन्यामुळे आर. प्रज्ञानंदला 'कँडिडेट्स' स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या 'कँडिडेट्स' स्पर्धेसाठी पात्र ठरणारा प्रज्ञानंद हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यामुळे कार्लसनविना होणाऱ्या या स्पर्धेत आर. प्रज्ञानंदला विशेष कामगिरी करण्याची संधी असणार आहे.