सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दीकी यांचे निधन

09 Aug 2023 12:22:19
 
siddique
 
 
 
 
 
 
प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, निर्माते सिद्दीकी इस्माइल यांचे मंगळवारी दि. ८ ऑगस्ट रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. यकृताच्या आजारामुळे त्रस्त असल्यामुळे त्यांना काही दिवसांपुर्वी कोची येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी, सिद्दीकी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांचे दु:खद निधन झाले.
सिद्दीकी इस्माइल यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिद्दीकी यांच्या पश्चात पत्नी सजिता आणि त्यांच्या तीन मुली- सुमाया, सारा आणि सुकून असा परिवार आहे.
 
सिद्दिकींसाठी नेत्यांनी व्यक्त केला शोक
 
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के सुधाकरन यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्मत्याच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. "मल्याळम चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक, सिद्दिकी यांच्या दुःखद निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. कॉमेडी आणि मनोरंजनासाठी बेंचमार्क सेट करू शकतील अशा पात्रांसह त्यांनी नेहमी महत्वपुर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो," असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खानयांनी ट्विटमध्ये म्हटले आहे
 
सिद्दीकी इस्माईल यांचे चित्रपट
 
सिद्दीकी-लाल या जोडीने दिग्दर्शनात आपली कारकीर्द सुरू केली आणि रामजी राव स्पीकिंग (१९८९) या विनोदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीच पदार्पण केले. 'हरिहर नगर' (१९९०), 'गॉडफादर' (१९९१), 'व्हिएतनाम कॉलनी' (१९९२), 'काबुलीवाला' (१९९३), 'हिटलर' (१९९६) सारखे सुपरहिट चित्रपट साकारले. मल्याळम व्यतिरिक्त, सिद्दिकी तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांचे देखील दिग्दर्शक आहेत. त्यांनी सलमान खानच्या बॉडीगार्ड या हिंदी चितत्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
Powered By Sangraha 9.0