Work From Home : कार्यक्षमतेत दोन तृतीयांश घट झाल्याचे संशोधनातून उघड

09 Aug 2023 17:17:23
University of California Research Revealed On Work From Home

मुंबई
: कोरोना काळात नोकरीच्या निमित्ताने कार्यालयात जाणे जवळपास दुरापास्त झाले होते. त्यामुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना नावारुपाला आली. त्यानंतर आजमितीस मोजक्या आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा अद्याप उपलब्ध आहे. परंतु, याच वर्क फ्रॉम होम संकल्पनेमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

दरम्यान, वर्क फ्रॉम होम संकल्पनेमुळे भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमतेत घट झाली असून कर्मचारी कमी पगारात काम करण्यास तयार झाले आहेत. दरम्यान, घरबसल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांपेक्षा जवळपास १८ टक्क्यांहून कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिकतेवर परिणाम झाला असून विद्यापीठाने भारतीय कर्मचाऱ्यांवर केलेल्या संशोधनामुळे भारतीय कामगारांच्या उत्पादकतेत दोन तृतीयांश घट झाल्याचे उघड झाले आहे. तसेच, ६० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कमी पगारावरही काम करण्यास तयार आहेत तर ८० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना दूरस्थ कामाची सोय मिळाली तर त्यांना कंपनीत राहायला आवडेल. तसेच, जॉब साइट इंडिडच्या अहवालानुसार, 'रिमोट वर्क' नोकऱ्यांच्या शोधात ३५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दुसरीकडे, ५० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मते, दूरस्थ कामामुळे त्यांची उत्पादकता वाढली असून ते ८ तासांच्या शिफ्टमध्ये अधिक काम करू शकतात. उलटपक्षी ७० टक्के कर्मचारी कार्यालयात अधिक उत्पादक असल्याचे मानतात.







Powered By Sangraha 9.0