मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी रामचंद्र नरके (६०) यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फुले साहित्याचा अभ्यासक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचा मोठा वाटा राहिला. त्यांनी ५६ पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे. याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्या आधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.