मुंबई : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वखार महामंडळातील ३०२ पदांची भरतीप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या भरतीप्रक्रियेतून नवे ३०० हून अधिक कर्मचारी भरण्यात येणार आहेत. दरम्यान, राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. ते महामंडळाच्या ६६व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, "शेतकऱ्यांना फायदा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे वखार महामंडळातून केलं जात. मात्र, महामंडळाकडे तुरळक मनुष्यबळ असल्याने ३०२ नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ३ ते ४ दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल, असेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.