माहिती लपवताय ? सावधान सेबीचा नव्या अहवालात नवी तरतूद
नवी दिल्ली : सेबी (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने आपल्या वार्षिक अहवालात,सेबी ही लिस्टेड कंपन्यांची पब्लिक ऑफर आणि माहितीपत्र यांची खातरजमा करेल अस नुकतच म्हटले आहे. उद्योग समुह व मोठ्या कंपनी समुहांनी देखील याची खातरजमा करून आवश्यक ती सगळी माहिती सार्वजनिक करावी असे आवाहन सेबीने केल आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील व लिस्टेड कंपन्यांचा गुंतवणूकदारांनी एखाद्या दुसऱ्या पब्लिक सेक्टर मध्ये गुंतवणूक व व्यवहार केल्यास त्याचा लेखाजोखा सेबीला द्यावा लागेल असे रिपोर्ट मध्ये म्हणले आहेत.सदरचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.