ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे निधन

05 Aug 2023 16:42:51
MGM Trustee Prataprao Borade Passed Away

महाराष्ट्र
: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. प्रतापराव बोराडे हे महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त व जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांचे राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात बहुमुल्य योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रतापराव बोराडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे असून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीमध्ये योगदान असणाऱ्यांमध्ये प्रतापराव बोराडेंचे देखील महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यामुळे बोराडेंच्या निधनामुळे मराठवाडाच्या शैक्षणिक क्षेत्रातलं नेतृत्व हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी शोक व्यक्त केला आहे.


Powered By Sangraha 9.0