"किशोरी पेडणेकरांनंतर आणखी तिघांचा नंबर.." किरीट सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट!

05 Aug 2023 14:19:04

Kirit Somaiya  
 
 
मुंबई : कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. या संपूर्ण प्रकारणावर आता भाजपा नेते किरीट सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
 
मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग २ हजार रुपयांऐवजी ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला. किरीट सोमय्या म्हणाले, "किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार. मुंबईच्या महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधिची तक्रार मुंबई पोलिसात केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरु आहे. यावरही कारवाई होणार आहे. आधी संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार." असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0