वसई पूर्वेला यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्येक्षिक

04 Aug 2023 18:14:06

vasai


खानिवडे : वसई तालुक्यातील पूर्वेला असलेल्याआडणे येथील शेतकरी मोरेश्वर कमलाकर पाटील यांच्या शेतीवर कृषी विभागाकडून यांत्रिकी पद्धतीने भात लागवड कशी करतात याचे प्रात्येक्षिक करून दाखवण्यात आले. महागाई आणि मजूर टंचाईच्या काळात भात शेती करणे हे परवडत नाही . यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात शेती कसणे सोडून दिले आहे .
 
पण आता अनेक प्रकारच्या भात लागवड व भात कापणी ची यंत्रे विकसित झाले आहेत. या यांत्रिक शेती पद्धती प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांच्या भात लागवडीच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत .शेतकरी आता यांत्रिकी कडे वाटचाल करत आहेत.
 
आडणे येथे झालेल्या प्रात्यक्षिकासाठी कुबोटा ट्रॅक्टर चे डीलर मिलिंद सावंत यांनी भात लागवड यंत्र आणून त्याचे भात लागवड प्रात्येक्षिक करून दाखवले आणि या यंत्राविषयी माहिती दिली. तर कृषी सहाय्यक नंदा चौधरी यांनी महा डी बी टी पोर्टलच्या योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले . तसेच कृषी विभागाकडून कृषी पर्यवेक्षक संजय बेदर, कृषी सहाय्यक संजय बरफ, रोहन संखे यांच्यासह परिसरातील भट उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Powered By Sangraha 9.0