सिंधुताई सपकाळ मालिकेत ‘ही’ अभिनेत्री साकारणार चिंधीच्या आजीची भूमिका

04 Aug 2023 15:26:28

sindhutai





मुंबई :
अनाथांची आई अर्थात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत अनाथांची आई म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘सिंधुताई सपकाळ’. महाराष्ट्राच्या अनाथ लेकरांची माई बनण्यापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर आणि अंगावर शहारे आणणारा होता. चिंधी अभिमान साठे पासून सिंधुताई सपकाळ असा प्रवास कसा घडला हे ‘सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची’ या मालिकेतून उलगडणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका १५ ऑगस्ट पासून प्रसारित होणार आहे.
 
‘सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची’ या मालिकेत सिंधुताईंची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या मालिकेत अभिनेते किरण माने सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका करत आहेत. चिंधीच्या आईची भूमिका योगिनी चौक साकारणार आहे. तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यात चिंधीच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने प्रिया बेर्डे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अभिनय करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
 
 
 
अनाथ मुलांच्या संगोपनासाठी माईंनी १९९२ साली सावित्रीबाई वसतिगृहाची स्थापना चिखलदरा येथे केली होती. आणि तिथून त्यांचा सुरु झालेला प्रवास हा शेवटपर्यंत सुरुच राहिला. लाखो अनाथ बालकांना सिंधुताईंनी करुणेचं आभाळ दिलं... त्यांचं संगोपनचं नव्हे तर प्रत्येकाची वैचारिक जडणघडण केली.
Powered By Sangraha 9.0