परदेशातून पार्थिव आणण्याची प्रक्रीया जलद होणार

04 Aug 2023 16:37:27
 
dead

मुंबई :
परदेशातून भारतीय व्यक्तीचे पार्थिव आणणे सोपे झाले आहे. सर्व विमान कंपन्यांनी मिळून एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केला असून त्याद्वारे आता परदेशातून एखादे पार्थिव आपल्या देशात आणणे अगदी सोपे झाले आहे.
 
एखाद्या भारतीय व्यक्तीचा परदेशात मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे पार्थिव त्याच्या मायदेशी आणली जाते. परंतू, या प्रक्रियेसाठी फार दिवस लागतात. मात्र, आता ही प्रक्रीया अगदी जलद झाली आहे.
 
सर्व विमान कंपन्यांनी मिळून ओपन-ई-केअर हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मच्य़ा माध्यमातून परदेशातून पार्थिव आणण्याची प्रक्रिया जलद करण्यात आली आहे. यासाठी अगदी थोड्याच कागदपत्रांची मागणी केली जाते.
 
भारतात पार्थिव नेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे
पॉवर ऑफ अॅटर्नी आणि कायदेशीर वारसाकडून संमती;
क्लिनिकल मृत्यू प्रमाणपत्र
गैर-संसर्गजन्य मृत्यू प्रमाणपत्र
पासपोर्ट
भारतीय दूतावासाकडून एनओसी

Powered By Sangraha 9.0