दहशतवाद्यांना पकडतानाचे सीसीटीव्ही आले समोर; कोथरुड पोलीसांची धाडसी कामगिरी

04 Aug 2023 15:38:57
Pune City Police Arrested Terrorists

पुणे
: पुणे शहर पोलिसांच्या कोथरुड पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना १८ जुलैच्या मध्यरात्री पकडले होते. वाहनचोरी करीत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर या तिघांना त्यांच्या कोंढव्यातील घरी झडती घेण्यासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन पुन्हा पकडले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४) आणि शाहनवाज या तिघांना कोथरुड पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील दोन पोलिसांनी पकडले होते. पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन या दोघांनी ही कामगिरी केली होती. हे तिघेही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या घरझडतीसाठी कोंढव्यात नेण्यात आले. त्यावेळी या तिघांनी तेथून पळ काढण्यात प्रयत्न केला. शाहनवाज हा तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. तर, साकी याला पोलीस उपनिरीक्षक बाला रफिक शेख यांनी पकडून ठेवले. खानला अन्य पोलिसांनी पकडले. याच घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहे.

आरोपींच्या घरातून जिवंत काडतूस, चार मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्डडिस्क, इलेक्ट्रिक वस्तू, बॉम्ब बनविण्याचे सर्किट, ड्रोन आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. हे सर्व आरोपी एनआयएच्या वॉन्टेड लिस्टमधील दहशतवादी आहेत. एटीएसने आतापर्यंत कातिल दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादिर (वय ३२, रा. कोंढवा), अभियंता सीमाब नसरुद्दीन काझी (वय २७, सध्या रा. कोंढवा), झुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, जि. ठाणे) यांच्यासह एकूण पाच जणांना अटक केली आहे.



Powered By Sangraha 9.0