Paytm Launched India's First Pocket Soundbox

04 Aug 2023 15:55:36
 
 

Paytym
 
 
 
पेटीएमने भारतातील पहिले पॉकेट साऊंडबॉक्‍स आणि म्‍युझिक साऊंडबॉक्‍स लाँच केले
 
डेबिट कार्डच्या आकाराचा साऊंडबॉक्‍स व्‍यापाऱ्यांना त्‍वरित ऑडिओ पेमेंट्स अलर्टस देईल.
 

मुंबई :  भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्‍ड पेटीएमची मालक असलेल्‍या वन९७ कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेड (ओसीएल)ने आज ४जी सक्षम दोन नाविन्‍यपूर्ण पेमेंट डिवाईसेस -पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स व पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍सच्‍या लाँचची घोषणा केली.
 
 
पोर्टेबल डिवाईस पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स तुमच्‍या खिशामध्‍ये सहजपणे मावू शकतो जो डेबिट कार्ड इतक्‍या लहान आकाराचा आहे.हा पॉकेट साऊंडबॉक्‍स नेहमी व्‍यस्‍त असलेल्‍या व्‍यापाऱ्यांना त्‍वरित ऑडिओ पेमेंट्स अलर्टससह सक्षम करतो.अभिमानाने 'मेड इन इंडिया'व वाहून नेण्‍यास सुलभ असलेल्‍या डिवाईसमध्‍ये ५ दिवसांपर्यंत टिकणारी बॅटरी,४जी कनेक्‍टीव्‍हीटी आणि अंधुक प्रकाशात सुस्‍पष्‍ट दिसण्‍यासाठी टॉर्च आहे.
 
 
पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍समध्‍ये असलेला स्‍पीकर पेमेंटबाबत नोटिफिकेशन्‍स देतो आणि ब्‍ल्‍यूटूथच्‍या माध्‍यमातून गाणी ऐकण्‍यासाठी फोनशी देखील कनेक्‍ट करता येऊ शकतो.या म्‍युझिक साऊंडबॉक्‍समध्‍ये दर्जात्‍मक ७ दिवसांपर्यंत टिकणारी बॅटरी,४जी कनेक्‍टीव्‍हीटी आणि शक्तिशाली ४ वॅट स्‍पीकर आहे.तसेच वॉईस ओव्‍हरले वैशिष्‍ट्य देखील आहे,जे व्‍यापाऱ्यांना म्‍युझिक सुरू असताना पेमेंट नोटिफिकेशन्‍स ऐकण्‍याची सुविधा देते.
 
 
पेटीएमचे संस्थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्‍हणाले,"मोबाइल पेमेंट्स व क्‍यूआर तंत्रज्ञानाचे अग्रणी म्‍हणून आम्‍ही पेटीएम साऊंडबॉक्‍ससह इन-स्‍टोअर पेमेंट्समध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणला.आम्‍ही दोन नवीन डिवाईसेस पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स व पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍ससह नाविन्‍यतेला अधिक चालना देत आहोत.हे दोन्‍ही डिवाईसेस व्‍यापाऱ्यांना सोयीसुविधा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स व्‍यस्‍त असलेल्‍या व्‍यापाऱ्यांसाठी गेमचेंजर ठरेल,तर पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स पेमेंट अलर्टस् देतो आणि जीवनशैलीमधील समस्‍यांचे निराकरण देखील करतो.या नवीन डिवाईसेससह आम्‍ही भारतातील लहान दुकानांसाठी तंत्रज्ञानामध्‍ये अग्रस्‍थानी राहू."
Powered By Sangraha 9.0