नूह हिंसाचार; १०२ एफआयआर, २०२ जणांना अटक तर ८४जण ताब्यात, गृहमंत्री अनिल विज यांची माहिती

04 Aug 2023 16:04:01
Haryana government Home Minister Anil Vij

नवी दिल्ली :
नूह येथील हिंसाचारानंतर हरियाणा सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाई करत आहे. दरम्यान, हरियाणा सरकारमधील गृहमंत्री अनिल विज यांनी यासंदर्भात माहिती दिली असून आतापर्यंत १०२ एफआयआर दाखल करण्यात आल्या असून २०० हून अधिक जणांना पोलीसांनी अटक केली आहे. तर ८४ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

तसेच, हरियाणा सरकारचे यासर्व तपासावर लक्ष असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले, नूहमध्ये पोलिस सतत तैनात आहेत आणि आतापर्यंत २०२ जणांना अटक करण्यात आली आहे. 'निर्दोषांना शिक्षा होऊ नये आणि दोषींना सोडले जाऊ नये' या तत्त्वावर पोलिस काम करत असून यासंदर्भात ठोस पुरावे गोळा करून कारवाई करावी लागेल तसेच एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नसल्याचे गृहमंत्री विज यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
दरम्यान, हरियाणाच्या नूहमध्ये, कट्टरपंथी मुस्लिमांच्या जमावाने दि. ३१ जुलै रोजी जलाभिषेक यात्रेत सहभागी असलेल्या हजारो हिंदू भाविकांवर हल्ला केला. या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमधून अनेक तपशील समोर आले आहेत. हरियाणा पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक धर्मेंद्र यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आक्षेपार्ह घोषणा देत हिंसक जमावाने नल्हाड महादेव मंदिरात भाविकांवर हल्ला केला.





Powered By Sangraha 9.0