'आप'चा आणखी एक खासदार अधिवेशनातून निलंबित

04 Aug 2023 16:25:43
Aam Aadmi Party MP Sushil Kumar Rinku Suspended

नवी दिल्ली :
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांकडून सतत गोंधळ पाहायला मिळतो. यातच आता आम आदमी पार्टीचे खासदार सुशील कुमार रिंकू यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या आवाजी मतदान मंजूर झाल्यानंतर आपचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनी संसदेचे सभापती ओम बिर्ला यांच्या दिशेने कागदे भिरकावली. या कृतीमुळे त्यांना पावसाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. 

सध्या देशाच्या संसदेत पावसाळी अधिवेशन गाजतय ते मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून त्यावरून विरोधकांकडून चांगलाच गोंधळ घातलेला पाहायला मिळत आहे. आपचे खासदार निलंबित करण्याची ही दुसरी वेळ असून याआधी संजय सिंह यांनादेखील मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यांवरून गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात आले होते. 




Powered By Sangraha 9.0