सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींसाठी उद्धव ठाकरेंच्या पायघड्या!

31 Aug 2023 16:14:13
 rahul-soniya gandhi
 
मुंबई : विरोधकांच्या आघाडीची बैठक मुंबईमध्ये सुरु झाली आहे. या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधी नेत्यांचे आदरातिथ्य करण्याची जबाबदारी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडेच आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी देखील सहभागी झाले आहेत. त्यांचे जंगी स्वागत उबाठा गटाकडून करण्यात आले. राहुल गांधींच्या स्वागतावर नेटकऱ्यांनी उबाठा गटाला चांगलेच निशाण्यावर घेतले आहे.
 
राहुल गांधींनी अनेकवेळा आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी सावरकरांचा अपमान केला होता. त्यामुळे हिंदुत्वाची भाषा बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता नेटकऱ्यांनी चांगलेच निशाण्यावर घेतले आहे.
 
नेटकऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना त्यांना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या केलेल्या अपमानाची आठवण करुन दिली. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी आपल्या विचाराशी तडजोड करत असल्याचा आरोपही एका नेटकऱ्याने लावला. तर काही नेटकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना राजस्थान आणि कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कशाप्रकारे तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. याची आठवण करुन दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0