टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जीने SSIM बरोबर केला ग्रीन एनर्जी प्लँटसाठी करार

31 Aug 2023 18:18:45
Solar
 
 
 
 
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जीने SSIM बरोबर केला ग्रीन एनर्जी प्लँटसाठी करार
 
 
  
२८ मेगावॉट सोलार एनर्जी प्लँट साठी हा महत्वाचा करार
 
 
 

पीटीआय:   टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड ( TPREL) ने Sanyo Special Steel Manufacturing (SSMI) शी भागीदारी करून २८.१२ मेगावॉटचा ग्रीन एनर्जी प्लांट टाटा ग्रुप महाराष्ट्रात उभा करणार आहे.  टाटा पॉवरची सबसिडरी TPREL ने निवेदनात म्हणल्याप्रमाणे Sanyo बरोबर पॉवर डिलिव्हरी अग्रीमेंट ( PDA) केलेले आहे.
 
 
टीआरपीइल (TRPEL) ने Sanyo बरोबर हातमिळवणी केल्यावर सोलापूर येथे २८.१२५ मेगावॉटचा एसी सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.  दरवर्षी ६१.८७५ मिलियन युनिट्स ची इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाईल. या उर्जा निर्मितीमुळे Sanyo ला स्टील उत्पादनात पुरक ठरेल असे सांगितले जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0