मिशनरी शाळेत विद्यार्थ्यांच्या हातातील राख्या कापल्या; पालकांच्या आंदोलनानंतर मागितली माफी

31 Aug 2023 12:30:08
Bareilly School 
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका मिशनरी शाळेत विद्यार्थ्यांची राखी कात्रीने कापल्याची घटना समोर आली आहे. शाळेत हिंदू धर्माचा प्रचार करता येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या प्रकरणी पालक आणि हिंदू संघटनांच्या विरोधानंतर शाळेने माफी मागितली आहे.
 
होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल असे या शाळेचे नाव आहे. ही शाळा बरेलीच्या आमला सर्कल भागात भामोरा रोडवर आहे. विद्यार्थ्यांची राखी कापण्याची घटना सोमवारी (२८ ऑगस्ट २०२३) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी काही विद्यार्थी राखी बांधून शाळेत आले होते. याबाबत माहिती मिळताच एका शिक्षिकेने कात्रीने विद्यार्थ्यांच्या राख्या कापून टाकल्या.
 
यासाठी आंदोलकांनी शगुफ्ता अन्सारी नावाच्या शिक्षिकेला जबाबदार धरले आहे. या शाळेत ती मुलांना विज्ञान शिकवते असे सांगितले जाते. शाळेतून घरी गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी राखी कापल्याची घटना पालकांना सांगितली. पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी २९ ऑगस्ट रोजी तक्रार घेऊन शाळा गाठली.
 
हिंदू संघटनांना हे प्रकरण कळताच तेही पालकांसह आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, शाळा प्रशासनाने आपली चूक मान्य करत भविष्यात अशा चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, असे लेखी आश्वासन दिले आहे. लेखी आश्वासनानंतर हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0