ममतांना भाजप कार्यकर्त्यांचा दणका! दिल्या जय श्री रामच्या घोषणा!

30 Aug 2023 19:01:03
Trinamool Congress president Mamata Banerjee

मुंबई :
विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीच्या दि. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंगळुरु येथील बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेत्यांकडून तयारीस सुरुवात झाली आहे. त्यातच आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी भाजपकडून जोरदार जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, ममता बँनर्जींचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जय श्री रामचा नारा दिला. तसेच, विरोधी आघाडीच्या नेत्यांसाठी उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून भोजन असणार आहे. यासाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी विरोधी पक्षीय नेत्यांचा राबता असणार आहे.



Powered By Sangraha 9.0