मोबाईल घेताना SAR Value महत्त्वाची; जाणून घ्या SAR Value म्हणजे नेमकं काय

30 Aug 2023 12:27:08
Specific Absorption Rate In Mobile Phones

मुंबई :
आपण जर मोबाईल खरेदी करण्यासाठी मोबाईल शॉपमध्ये गेलो तर सर्वात आधी आपण मोबाईलचा कॅमेरा, डिस्प्ले स्क्रिन, बॅकअप चेक करतो. मोबाईल घेताना त्यांची 'SAR Value' चेक करत नाही. त्यामुळे तुम्ही जर कधी मोबाईल घेण्याकरिता गेलात तर सर्वात आधी 'SAR Value' एकदा चेक करून घ्या.

SAR Value म्हणजे नेमकं काय?

मोबाईलची 'SAR Value' अत्यंत महत्त्वाची असून त्याचा संबंध रेडिएशनची असतो. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मोबाईल वापरकर्त्यांच्या शरीराला हानी पोहोचण्याची शक्यता असते. दरम्यान, Specific Absorption Rate (SAR)चे मूल्य मोबाईलमध्ये जास्त असल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होण्याचा धोका संभवतो.

तसेच, भारतातील दूरसंचार विभागाने मोबाईल वापरकर्त्यांच्या हिताच्या दृष्टीने मोबाईल फोनसाठी १.६W/Kg मूल्य निश्चित केले आहे. त्यामुळे तुम्ही जर मोबाईल फोन खरेदी करत असाल तर या 'SAR Value' चा विचार जरुर करावा आणि SAR Value जास्त असलेले मोबाईल फोन्स घेणे टाळा.

वर नमूद केल्याप्रमाणे, 'SAR Value' तुमचा फोन उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीचे मूल्यांकन करण्यात मदत करते. फोनची रेडिएशन पातळी तपासताना तुम्ही 'SAR Value' वापरू शकता, परंतु तुमच्या शरीरात जास्तीत जास्त संभाव्य 'RadioFrequency' एक्सपोजरबद्दल अनेक बाहेरील घटक परिणाम करू शकतात.



Powered By Sangraha 9.0