दक्षिण रेल्वेत नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी; आजच अर्ज करा

30 Aug 2023 12:46:34
Southern Railway Recruitment 2023

मुंबई :
दक्षिण रेल्वेतंर्गत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. यानंतर उमेदवारास अर्ज करता येणार नाही. अपवाद रेल्वेकडून बोर्डाकडून जर काही अधिसूचना जारी करण्यात आली तर पुन्हा एकदा मुदतवाढ होऊन संधी मिळून शकते. दक्षिण रेल्वे भरतीप्रक्रियेतून १० वी पास, आयटीआय आणि डिप्लोमा पदवीधरांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, दक्षिण रेल्वेतील विविध ७९० रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दक्षिण रेल्वे भरती अंतर्गत ‘असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर’ पदांच्या एकूण ७९० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२३ आहे.

शैक्षणिक पात्रता

असिस्टंट लोको पायलट – संबंधित क्षेत्रात १० वी / आयटीआय

तंत्रज्ञ – १० वी /संबंधित क्षेत्रात आयटीआय

कनिष्ठ अभियंता – संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा

ट्रेन मॅनेजर – पदवी, पदवी

रिक्त पदांचा तपशील

असिस्टंट लोको पायलट – २३४ पदे

तंत्रज्ञ – ३६१ पदे

कनिष्ठ अभियंता – १६८ पदे

ट्रेन मॅनेजर – २७ पदे

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट sr.indianrailways.gov.in ला भेट द्या.

Powered By Sangraha 9.0