जगाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत - अजय पिरामल

30 Aug 2023 17:29:33
Ajay Piramal
 
 
 
 
जगाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत - अजय पिरामल
 
 

मुंबई : पिरामल इंटरप्राईजेसचे उद्योगपती अजय पिरामल यांनी 'इंडियन एक्स्प्रेस ' ला विशेष मुलाखत दिली आहे.  मॅन्युफॅक्चर ( उत्पादन) क्षेत्राच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आहे.  इन्फ्रास्ट्रक्चर, व्याजदर, विकास दर, आर्थिक मूल्यमापन अशा अनेक विषयांवर त्यांनी आपल मत व्यक्त केले आहे.  विशेषतः ८ टक्के जीडीपीचा दर गाठण्यासाठी गव्हर्नन्स मध्ये समाधानी असले तरी अजून गती हवी असे परखडपणे अधोरेखित केले आहे.  सध्याच्या महागाई, करन्सी अशा काही ' Volatile' मार्केट मध्येही देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.
 
 
इंडियन एक्स्प्रेस शी बोलताना जगाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे प्रतिपादन केले आहे.  सेवा क्षेत्रावर फक्त अवलंबून न राहता बाकी क्षेत्रात चतुरस्त्र कामगिरी करावी लागेल असेही त्यांनी सांगितले.  सध्याच्या उत्पादन क्षेत्रात वाढलेला विकास दर व आर्थिक प्रगती बघता ही पुढेही अशीच सुरू राहिल अशी आशा बोलताना व्यक्त केली आहे.
 
 
उत्पादन क्षेत्रात काही वर्षांपूर्वी खुंटलेली प्रगतीला ' बुस्टर ' डोस मिळाल्याने कुशल कारागीर व असंघटित कामगार या विशेष क्षेत्रात देखील अमुलाग्र बदल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  व्याजदरांचा बाबतीत सुधारणा होतानाच अनेक नियामक मंडळाच्या कामकाजात एकरूपता आल्यास देशात अजून बदल होऊ शकतो.  Capex (कॅपिटल एक्सपेंडिचर) मध्ये सुधारणा झाल्याचा दुजोरा देत पूर्ण क्षमतेने अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे सूचक वक्तव्य पिरामल ग्रुपचे अजय पिरामल यांनी मुलाखतीत केले आहे.
 
 
बँकेचे लायसन्स मिळवणार का? या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले तरी बँका आणि एनबीएफसी यांच्या compliance मध्ये चांगली उपाययोजना झाली असून आरबीआयचा मार्गदर्शनात आपण याहून अधिक कामगिरी करू असे मात्र उद्देशून सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0