महाराष्ट्रावर वरुणराजाची कृपा ; हवामान खात्याचा अंदाज

30 Aug 2023 19:39:33

rain


बुलढाणा :
यावर्षी पावसाने दांडी मारल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक तलाव तसेच धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
 
दरम्यान, हवामान विभागाने २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या दिवसांत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात कोकण विभागातील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0