मुंबई : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातील भरतीप्रक्रियेस सुरुवात झाली असून उमेदरवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेऊन अर्ज करावयाचा आहे. लातूर जिल्हा आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली असून आरोग्य विभागातील ४२८ रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीप्रक्रियेद्वारे पदवीधरांना लातूर जिल्ह्यात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, या भरतीसाठी १० वी, १२ वी, आयटीआय तसेच, पदवीधर याकरिता अर्ज करु शकतात. लातूर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तब्बल १६७१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आरोग्य विभागातील ४२८ रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ असणार आहे.
अधिकृत वेबसाईट – http://arogya.maharashtra.gov.in