आरोग्य विभागात अर्ज करण्यास आजपासून सुरुवात; त्वरित अर्ज करा

30 Aug 2023 11:54:19
Maharashtra State Department of Public Health Recruitment 2023

मुंबई :
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून आरोग्य विभागातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली पदे भरण्याचा निर्णय अधिवेशनात घेतला होता.

दरम्यान, या भरतीमार्फत राज्य आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ इ. रिक्त पदे भरली जाणार आहेत. तसेच, आरोग्य विभागातील एकूण १०, ९४९ पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

भरतीद्वारे आरोग्य विभागातील 'क' गट आणि 'ड' संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात 'क' गटातील ६,९३९ पदे तर 'ड' गटातील ४०१० पदे रिक्त असून ही सर्व पदे लवकरच भरली जाणार आहेत. अर्ज करण्यास दि. २९ ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून अंतिम मुदत दि. १८ सप्टेंबर २०२३ असणार आहे.

अधिक माहितीसाठी arogya.maharashtra.gov.in  ला भेट द्या.





Powered By Sangraha 9.0