मोठी बातमी! 'एमपीएससी'मार्फत भरल्या जाणाऱ्या ‘या’ पदांच्या संख्येत वाढ

30 Aug 2023 15:58:19
MPSC Non-Gazetted Officer Posts Increased

महाराष्ट्र :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) यांच्यामार्फत राज्यातील विविध रिक्त पदे भरली जातात. राज्य शासनाच्या वतीने विविध रिक्त पदे भरण्यासाठी बंपर भरती केली जाईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी संधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. तसेच, एमपीएससीतर्फे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांच्या संख्येत यंदा वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ संदर्भात एक पत्रक एमपीएससीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले आहे. या प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मार्फत एकूण ८१७० ऐवजी ८२५६ पदांची भरती करण्यात येईल.

तसेच, दि. २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तसेच दिनांक २८ जून, २०२३, ०७ जुलै, २०२३ व दिनांक ०८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार भरावयाच्या एकूण ८१७० पदांचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार, शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १० ऑगस्ट रोजी, तर २५ ऑगस्ट रोजीच्या पत्रकानुसार लिपिक- टंकलेखक व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरीता सुधारित पदसंख्येची मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत.




Powered By Sangraha 9.0