नंदुरबार : शरद पवार यांनी आता आराम करायला हवा. असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पुनावाला यांनी शरद पवारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस सायरस पुनावाला यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुनावाला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सायरस पुनावाला म्हणाले, "शरद पवार यांचा पंतप्रधान होण्याचा दोन वेळा चान्स हुकला. त्यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे. त्यांचं वय झालं आहे. माझं वय झालं आहे. त्यांनी आराम करायला हवा. शरद पवारांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. ते खूप हुशार व्यक्ती आहेत. त्यांचे वय झाले असून शरद पवारांनी आता रिटायर व्हावे." असं ते म्हणाले.
डेंग्यू आणि मलेरियाच्या लसीवर पुनावाला म्हणाले, "सिरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस आणणार आहे. डेंग्यूवरील लस वर्षभरात मार्केटमध्ये आणणार आहे. डेंग्यू आजार सध्या देशभरात पसरला आहे."