नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ५२५६ पदांसाठी लवकरच भरती होणार

29 Aug 2023 17:35:37
Navi Mumbai Police Recruitment २०२३

मुंबई :
राज्य शासनाकडून १० पोलिस आयुक्तालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी देण्यात आली आहे. या सुधारित मंजुरी आकृतिबंधात नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचाही समावेश आहे. दरम्यान, या आयुक्तालयासाठी ५२५६ पदे मंजूर केली असून, ३५ पदे बाह्ययंत्रणांद्वारे घेण्यासाठी मान्यता राज्य शासनाने दिली आहे.

तसेच, ठाणे आयुक्तालयाचा भाग असलेल्या नवी मुंबईसाठी १९९४ मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय तयार करण्यात आले आहे. या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल व उरण तालुका यांचा समावेश असून गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, अमानवी वाहतूक विरोधी कक्षासह इतर शाखाही आहेत.

आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तपशील

आयुक्त – १, सहपोलिस आयुक्त – १, अपर पोलिस आयुक्त – १, पोलिस उपायुक्त – ६, पोलिस अधीक्षक – १, उपअधीक्षक – २, सहायक आयुक्त – ११, निरीक्षक – ८६, राखीव निरीक्षक – १, सहायक पोलिस निरीक्षक – २०२, उपनिरीक्षक – २४१, राखीव उपनिरीक्षक – २, सहायक पोलिस उपनिरीक्षक – २८१, हवालदार – १४८८, शिपाई – २७३७, उपनिरीक्षक चालक – १, हवालदार चालक – ४, शिपाई चालक – ११३, प्रशासकीय अधिकारी – १, स्वीय सहायक – १, उच्चश्रेणी लघुलेखक – २, निम्नश्रेणी लघुलेखक – २, कार्यालय अधीक्षक – १, लेखा अधिकारी १, सहायक लेखा अधिकारी १, स्थापत्य अभियंता १, प्रमुख लिपिक ८, वरिष्ठ श्रेणी लिपिक १५, कनिष्ठ श्रेणी लिपिक ४४ अशा पदांचा समावेश आहे.

बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार पदे

कार्यालयीन शिपाई – १५, मेस मॅनेजर १, सफाई कामगार १४, शिंपी १, मुख्य आचारी १, सहायक आचारी १, भोजनालय सेवक १, मेस सर्व्हंट १.


Powered By Sangraha 9.0