महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे 'या' पदांसाठी भरती

29 Aug 2023 17:59:48
MES Pune Recruitment 2023

मुंबई :
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक‘ पदांसाठी भरती केली जाणार असून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमधील रिक्त पदांच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आहे.

तसेच, उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाईन पध्दतीने कुलसचिव, आरक्षण कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४११००७, या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे होईल. केवळ पात्र उमेदवारांचे अर्ज, संपूर्ण तपशीलांसह आणि सर्व बाबतीत पूर्ण, शॉर्टलिस्टिंगसाठी विचारात घेतले जातील. पात्र उमेदवारांपैकी फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.



Powered By Sangraha 9.0