फडणवीसांची 'जपान'वारी ठरली फायदेशीर; प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र अग्रेसर

28 Aug 2023 16:30:03
Maharashtra No 1 In Foreign Direct Investment

मुंबई :
महाराष्ट्र राज्याची औद्योगिक भरारी सुरुच असून प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत देशातील राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ₹१,१८,४२२ कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, 'डीपीआयआयटी'ने एप्रिल ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ₹३६,६३४ कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. तर दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक असल्याची माहितीतून समोर आले आहे.

याचबरोबर काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'स्टेट गेस्ट' म्हणून जपानचा दौरा केला होता. यामाध्यमातून राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. तसेच, जपानी कॉर्पोरेट कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील सरकारची यशस्वी घौडदौड सुरु असून परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.



Powered By Sangraha 9.0