'इंडियन ऑईल'मध्ये अॅप्रेंटिस पदासाठी भरती; असा अर्ज करा

28 Aug 2023 18:30:40
Indian Oil Corporation Limited Recruitment 2023

मुंबई :
'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड'मध्ये अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिडेट (आयओसीएल)मधील अॅप्रेंटिसच्या ४९० पदांसाठी अर्ज मागवेल आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून अर्जाची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२३ असणार आहे.

दरम्यान, अॅप्रेंटिस पदासाठी भरती मोहिमेंतर्गत ४९० टेक्निशिअन, ट्रेड अप्रेंटिस आणि अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह/ग्रॅज्युएट अप्रेंटिस (‘टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) भरण्यासाठी आयोजित केली जात आहे. भरतीकरिता उमेदवाराचे वय १९ ते २४ वर्षे दरम्यान असावे. तसेच, भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट iocl.com ला भेट देऊ शकता.

'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' अप्रेंटिस भरती २०२३ साठी पुढीलप्रमाणे अर्ज करा.

http://www.iocl.com या वेबसाइटला भेट देऊन Apprentice टॅबवर क्लिक करा.

सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरा.

त्यानंतर फॉर्म सबमिट करा.
Powered By Sangraha 9.0