मुंबई : कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी)अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यात ‘वैद्यकिय अधिकारी’ या पदाच्या १५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी पदांनुसार अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२३ आहे.
दरम्यान, कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये “ज्येष्ठ रहिवासी, अर्धवेळ विशेषज्ञ, आयुर्वेद चिकित्सक, कार्डिओलॉजी” पदांच्या एकूण ४३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, अर्ज करण्यासाठी
ई-मेल पत्ता – establishpune.amo@gmail.com.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे ४११०३७
ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ०४, ०५ आणि ०६ सप्टेंबर २०२३ असणार आहे. तसेच, मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लॉक, ५ वा मजला, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, भर्ती शाखा, ईएसआयसी हॉस्पिटल कांदिवली परिसर, आकुर्ली रोड, ठाकूर घराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१.