शरद पवार हे माझे दैवत, मी त्यांचं ऐकलंच पाहिजे; बीडमधील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य

27 Aug 2023 20:14:55
State agriculture minister Dhananjay Munde In Beed Sabha

मुंबई :
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून बीड येथील जाहीर सभेतून जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा उल्लेख करताना भाषणात म्हटले की, 'एकच वादा, अजितदादा असा उल्लेख करतानाच मुंडे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील जनेतला वादा करावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली. तसेच, बीड जिल्ह्याच्या अनेक विकामकामांना गती दिलीत, असेही मुंडे म्हणाले.

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी काय दिले, असा सवालही त्यांनी शरद पवारांना विचारला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना मदत मिळवून दिली असल्याचा उच्चार मुंडेंनी केला. तर धरणात पाणी आणण्यासाठी तुम्ही जे काही करायचे ते करा, असेहीदेखील धनंजय मुंडे भाषणात म्हणाले.

बीडमधील विराट आणि ऐतिहासिक सभा ही विकासाची सभा आहे. मुंडे म्हणाले, अजित पवारांनी मनात आणलं तर बीडमधील दुष्काळ संपुष्टात येईल, असे सांगतानाच अजितदादांमुळे जिल्ह्याच्या विकासास हातभार लागला त्यामुळे आपण त्यांचे नेतृत्व स्वीकारलं आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. शरद पवार हे माझे दैवत असून मी त्यांचं ऐकलंच पाहिजे, तसेच, शरद पवारांनी आपला इतिहास काढला, माझी कर्तबगारी पवारांच्याच पुस्तकात, हाच माझा इतिहास आहे, त्यामुळे प्रश्न कसे सोडवायचे आपल्याला चांगलेच माहीत आहे, असे मुंडे म्हणाले.

शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात माझ्या विधानपरिषदेतील कामगिरीचा उल्लेख असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवर मुंडे म्हणाले, मला पहाटे उठायची सवय नाही त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नसल्याचा मिश्किल टोला मुंडेंनी अजित पवारांना लगावला. तर अजित पवारांमुळेच आपण निवडून आल्याचे मुंडेंनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0