चांद्रयान-३ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाबाबतचा मोठा खुलासा जगासमोर

27 Aug 2023 19:37:29
Chandrayaan-3 Mission New Information By ISRO

नवी दिल्ली :
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)च्या 'चांद्रयान-३' मोहीमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाबाबतचा मोठा खुलासा जगासमोर आला आहे. दरम्यान, चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सांगितले आहे. लँडरला एक विशेष प्रकारचा थर्मामीटर पाठवण्यात आला आहे. यामार्फत मोठी माहिती इस्त्रोच्या संशोधकांच्या हाती लागली आहे.

दरम्यान, रोव्हरमध्ये बसविण्यात आलेल्या थर्मामीटरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाच्या वरचे तापमान आणि पृष्ठभागाच्या १० सेमी खाली म्हणजेच सुमारे ४ इंच खाली असलेले तापमान मोजू शकते. त्याला ड्रिलिंगची आवश्यकता नसून इस्रोने यासंदर्भात माहिती दिली आहे. चांद्रयान-३ चे 'थर्मोमीटर' कार्यरत असून चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सांगितले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागाचे तापमान ५० ते ६० अंश सेल्सिअस दरम्यान असते. इस्त्रोच्या माहितीनुसार, त्याच पृष्ठभागाच्या अगदी खाली, पाराच्या आत १० सेमी उणे १० अंश सेल्सिअस आहे. पण जसजसे तुम्ही पृष्ठभागाच्या खोलवर जाल तसतसे तापमान कमी होत जाईल, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे.

दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागाच्या वरचे, पृष्ठभागावरील आणि पृष्ठभागाच्या खाली १० सेमी पर्यंतचे तापमान मोजण्यासाठी 'ChaSTE' नावाचे उपकरण विक्रम लँडरकडे पाठवण्यात आले आहे. चांद्रयान-३ च्या लँडरमधील या पेलोडचे काम चंद्राच्या पृष्ठभागाच्या वातावरणाची माहिती घेणे असून हा एक प्रकारचा थर्मामीटर आहे.

इस्रोने 'ChaSTE' चा पहिला अहवाल प्रसिद्ध केला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभागाचे तापमान प्रथमच घेण्यात आले आहे. म्हणूनच हा आलेख खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आलेखाच्या डाव्या बाजूला पाहिले तर तुम्हाला खोली मिलीमीटरमध्ये लिहिलेली आढळेल. म्हणजे पृष्ठभाग किती खोल आहे

विक्रम लँडरवरील चार पेलोड काय करतील?

१. RAMBHA हे चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि फरक तपासेल.
२. ChaSTE हे चंद्राच्या पृष्ठभागाची उष्णता म्हणजेच तापमान तपासेल.
३. ILSA हे लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपीय क्रियाकलापांची तपासणी करेल.
४. Laser Retroreflector Array (LRA) तो चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

Powered By Sangraha 9.0