अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान १७ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार !

26 Aug 2023 15:40:38
 
sharukh khan and amitabh bachchcan
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी असं उच्चारलं की दोन चेहरे आपसुकच डोळ्यांसमोर येतात, ते म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता शाहरुख खान. हे दोन सुपरस्टार चक्क १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यामुळे या दोन्ही कलाकारांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
 
shahrukh khan 
 
मिळालेल्या माहिनुसार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार असले तरी नेमका तो चित्रपट किंवा कोणता प्रोजेक्ट असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या दोघांनी यापूर्वी ‘मोहब्बतें’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’, यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना मोहित केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी हे दोघे सज्ज आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0