MUCBF Recruitment 2023 : आजच अर्ज करा

26 Aug 2023 18:13:32
Maharashtra Urban Co-operative Banks Federation Ltd

मुंबई :
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२३ आहे.

दरम्यान, या पदभरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी लिपिक, प्रशिक्षणार्थी वरिष्ठ अधिकारी पदाच्या १९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार असून तसेच इच्छूक उमेदवाराकडे MS-CIT किंवा समतुल्य कोर्सचे सर्टिफिकेट असावे. त्याचबरोबर मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

या पदभरतीसाठी इच्छूक उमेदवाराचे वय प्रशिक्षणार्थी वरिष्ठ अधिकारी ३० – ४० वर्षे, प्रशिक्षणार्थी लिपिक २२ ते ३५ वर्षे या दरम्यान असावे. अर्ज करताना उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ रुपये भरावे लागतील.




Powered By Sangraha 9.0