पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्रीसचा "ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" पुरस्कार प्रदान

25 Aug 2023 16:46:05
PM Narendra Modi conferred with the Grand Cross of the Order

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेनंतर ग्रीस देशाच्या दौऱ्यावर असून देशातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार "ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" देण्यात आला आहे. ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षा कॅटरिना एन. सकेलारोपूलो यांनी पंतप्रधान मोदींना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच, हा सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष आणि लोकांचे आभार मानले आणि ग्रीसच्या लोकांचा भारताप्रती असलेला आदर दिसून येतो.

तसेच, पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट केली असून ते म्हणाले, “मला ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर बहाल केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष कॅटेरिना साकेलारोपौलो, सरकार आणि ग्रीसच्या लोकांचे आभार मानतो. यावरून ग्रीसच्या लोकांचा भारताप्रती असलेला आदर दिसून येतो.

दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स बैठकीत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्रीसला पोहोचले आहेत. गेल्या ४० वर्षांत ग्रीसला पोहोचणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९८३ मध्ये त्या ग्रीसला गेल्या होत्या. ग्रीसमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील छायाचित्रे शेअर केली आहेत.






Powered By Sangraha 9.0