'इंजिनियर्स'ना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

25 Aug 2023 16:12:38
Mumbai Railway Development Corporation Ltd Recruitment

मुंबई :
रेल्वेत नोकरीची संधी उपलब्ध असून इंजिनियर्सना याकरिता अर्ज करता येणार आहे. भारतीय रेल्वेतील मुंबई विभागातील अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी ‘प्रकल्प अभियंता’ पदाच्या २० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. रेल्वे मुंबई विभागातील २० रिक्त जागांसाठी दि. २५ ते २९ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट mrvc.indianrailways.gov.in ला भेट द्या.

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतद्वारे घेण्यात येणार असून मुलाखतीचा पत्ता – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई- ४०० ०२०. वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. मुलाखतीला जाताना उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे आणावीत. उमेदवार २५ ते २९ सप्टेंबर २०२३ तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर हजर राहतील.


Powered By Sangraha 9.0