भारतीय उद्योगजगतात होणार मोठा भुकंप ?

25 Aug 2023 12:13:46

Geroge
 
 
 
 
 भारतीय उद्योगजगतात होणार मोठा भुकंप ?
 
 

पीटीआय : अब्जोपती जॉर्ज सोरोस यांच्या अधिपत्याखालील  The Organised Crime and Corruption Reporting Project (OCCRP)  ही शोध पत्रकारितेच्या संस्थेने हिंडनबर्ग २.० ची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.  परदेशी फंडचे ' ट्रिपलिंग' केल्याचा ठपका ही एजन्सी करू शकते. परंतु कोणत्या कंपनीचा खुलासा होणार ते कळले नाही. 
 
 
 
पत्रकारांनीही या OCCRP  संस्थेला संपर्क केला असता अजून यासंबंधीची माहिती मिळू शकली नाही.  ही OCCRP संस्था ही संघटित गुन्हेगारी व तत्सम क्षेत्रात शोध पत्रकारिता करते.  जानेवारी २४ मध्ये हिंडनबर्गने शेअरच्या किंमतीत घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर सेबीने चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाला मुदत वाढवून मागितली होती. 
 
 
 
आता या OCCRP संस्थेच्या आगामी गौप्यस्फोटाकडे मार्केट मध्ये चाहूल लागल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 
Powered By Sangraha 9.0