नवी दिल्ली : लोकसभा समितीने राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व वापस मिळाल्यानंतर 12 तुघलक लेनवरील बंगला सरकारी निवास म्हणून दिला होता. पण राहुल गांधींना आता या घरात राहयचं नाही. राहुल गांधींना सरकारी बंगल्याचा ताबा आपल्याकडे १५ दिवसांच्या आत घ्यायचा होता. ज्यांची अंतिम मुदत २३ ऑगस्ट होती. पण राहुल गांधींनी बंगल्याचा ताबा घेतला नाही.
राहुल गांधी या बंगल्यात १९ वर्षांपासून राहत होते. मानहानीच्या आरोपात त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. त्यामुळे त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना आपला सरकारी बंगलाही खाली करावा लागला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी सध्या नवीन घराच्या शोधात आहेत.
१६ ऑगस्ट रोजी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासोबत ७ सफदरजंग लेनवरील बंगला पाहण्यासाठी गेले होते. २००४ मध्ये राहुल गांधी पहिल्यांदा अमेठीतून खासदार झाले होते. तोपर्यंत ते सोनिया गांधींच्या १० जनपथ येथील बंगल्यात राहत होता. २००५ मध्ये ते खासदार झाल्यावर त्यांना पहिल्यांदा १२ तुघलक लेन येथे बंगला देण्यात आला होता.