चांद्रयान-३ मोहिम यशस्वी होण्यासाठी देशभरात प्रार्थना

23 Aug 2023 11:29:51

Chandrayan-3


वाराणसी :
आज भारत चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ उतरवणार आहे. सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाला पहायला मिळणार आहे. या क्षणाची सर्वांनाच आतुरता लागली आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय विक्रम लँडरचे चंद्रावर प्रक्षेपण व्हावे आणि चांद्रयान-३ हे मिशन यशस्वीपणे पार पडावे यासाठी संपुर्ण देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.
 
यातच उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये दशाश्वमेध घाटावर विशेष आरती करण्यात आली आहे. १००१ दिवे प्रज्वलित करत ही विशेष आरती करण्यात आली आहे. आरतीच्या वेळी घाटावर १००१ दिव्यांनी चांद्रयान-३ असे लिहिले होते. यासोबतच चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी लखनऊमधील ऐशबाग इदगाह येथे जामा मशिदीतही दुआ मागण्यात आली आहे. दरम्यान, चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यास हा पराक्रम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.




Powered By Sangraha 9.0