"कॅग"मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १७७३ रिक्त जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरु

23 Aug 2023 19:02:21
Comptroller and Auditor General of India

मुंबई :
भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) मधील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत बेवसाईटवरून अर्ज भरावयाचा आहे. कॅगमधील तब्बल १७७३ रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.

दरम्यान, कॅग अर्थात भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक मध्ये प्रशासकीय सहाय्यक पदासाठी भरती आली आहे. cag.gov.in वर जाऊन उमेदवार फॉर्म भरू शकतात. या भरतीसाठी अर्ज १७ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर २०२३ आहे.

पदांची संख्या : १७७३

शैक्षणिक पात्रता

सीसीसी म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कडून संगणक संकल्पनांवर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र.
मान्यताप्राप्त संस्थेकडून संगणक अनुप्रयोगात प्रमाणपत्र.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे असावे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
Powered By Sangraha 9.0