'चांद्रयान-३'च्या यशस्वी मोहिमेसाठी रा.स्व.संघाच्या शुभेच्छा!

23 Aug 2023 11:37:19
sunil ambekar 
 
मुंबई : भारताची 'चांद्रयान-३' ही मोहिम यशस्वीपणे पूर्ण होताना आज दिसत आहे. इस्त्रोने सोडलेले चांद्रयान लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्ड होणार आहे. इस्त्रोने उचललेल्या या शिवधनुष्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. "भारताची 'चांद्रयान-३' ही मोहिम प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या मोहिमेद्वारे भारताच्या शास्त्रज्ज्ञांनी देशाचे नाव नक्कीच मोठे केले आहे. सर्वात स्वस्त, अगदी कमी वेळेत होणारी आणि जगभरात भारताची शान वाढवणारी अशी ही मोहिम आहे. त्यानिमित्त मी सर्व शास्त्रज्ज्ञांना शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की ही मोहिम सफलतापूर्वक यशस्वी होईल.", असे सुनीलजी यावेळी म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0