सातारा जिल्हा आरोग्य विभागातील रिक्त जागांकरिता भरती

22 Aug 2023 19:24:18
Zilla Parishad Satara Recruitment 2023

मुंबई :
सातारा जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त जागांकरिता भरतीप्रक्रिया सुरु झाली असून अर्ज मागविण्यात येत आहेत. या रिक्त जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अर्ज सादर करायचे आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद सातारा मार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी कंत्राटी व तात्पुरत्या स्वरुपात ‘योग प्रशिक्षक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑफलाईन/ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत. तसेच, जिल्ह्यात एकूण ७२ योग प्रशिक्षकांची पदे ३१ मार्च २०२४ पर्यंत मंजुर आहेत.

दरम्यान, योग प्रशिक्षकांना प्रति योग शिबिराकरिता रु. ५००/- मानधन दिले जाणार आहे. योग प्रशिक्षकाकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२३ असून अर्ज जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, सातारा या पत्त्यावर पाठवायचे आहेत. तसेच, अर्ज शुल्कासाठी धनादेश जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, सातारा, शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, शिवाजी सर्कल, पोवई नाका, सातारा या नावाने असावा.



Powered By Sangraha 9.0