पनवेल महानगरपालिकेत नोकरीची संधी; विविध पदांकरिता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

    22-Aug-2023
Total Views |
Panvel Municipal Corporation Recruitment

मुंबई :
पनवेल महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज भरायचे आहेत. दरम्यान, या भरती संदर्भात पनवेल महानगर पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामुळे ४१ पदांचे आणि ३७७ जागांसाठीचे सर्व तपशील दिले आहेत.

पनवेल महापालिकेतील रिक्त पदांसाठी अर्ज भरण्यास दि. १७ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती परंतु आता यामध्ये मुदतवाढ केली असून ३१ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. पनवेल महानगर पालिकेची ‘https://www.panvelcorporation.com’ ही अधिकृत वेबसाईट यावर भरतीसंदर्भात अपडेट मिळून जाईल.

दरम्यान, या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३८ वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयामध्ये ५ वर्षे सूट देण्यात आली आहे. तर परीक्षा शुल्कात गट अ आणि गट ब - १००० रुपये आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी ९०० रुपये तर गट क - ८०० रुपये आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी ७०० रुपये आणि गट ड - ६०० रुपये आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी ५०० रुपये असणार आहे.

पनवेल महानगर पालिकेतील भरतीसाठीची पदे आणि जागा

माता व बाल संगोपन - १, क्षयरोग अधिकारी - १, हिवताप अधिकारी - १, वैद्यकीय अधिकारी - ५, पशुशल्य चिकित्सक - १, महापालिका उप सचिव - १, महिला व बालकल्याण अधिकारी - १, माहिती व जनसंपर्क अधिकारी - १, सहाय्यक नगररचनाकार -२, संखिकी अधिकारी - १, उप मुख्य अग्निशमन - १, उप अग्निशमन केंद्र अधिकारी - ४, प्रमुख अग्निशमन विमोचक - ८, अग्निशामक - ७२, चालक यंत्र चालक - ३१, औषध निर्माता - १, सार्वजनिक आरोग्य परिचारिका - २, अधि. परिचारिका - ७, परिचारिका - २५, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - ७, कनिष्ठ अभियंता (विद्युत) - ६, कनिष्ठ अभियंता (संगणक) - १, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - १६, कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग) - १, सर्व्हेअर/भूमापक - ४, आरेखक (ड्राफ्ट्समन/स्थापत्य/तांत्रिक) - ३, सहाय्यक विधी अधिकारी - १, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी - १, सहाय्यक क्रीडा अधिकारी - १, सहाय्यक ग्रंथपाल - १, स्वच्छता निरीक्षक - ८, लघू लिपिक टंकलेखक - २, लघुलेखक (निम्न श्रेणी/इंग्रजी/मराठी) - १, कनिष्ठ लिपिक (लेखा) - ५, कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण) - ३, लिपिक टंकलेखन - ११८, वाहन चालक (जड) - १०, वाहन चालक (हलके) - ९, व्हॉलमन/कि- किपर - १, उद्यान पर्यवेक्षक - ४, माळी - ८, एकूण रिक्त जागा - ३७७ रिक्त आहेत.