MECL Recruitment 2023 : विविध पदांकरिता आजच अर्ज करा

22 Aug 2023 15:27:30
MINERAL EXPLORATION AND CONSULTANCY LIMITED

मुंबई :
मिनरल एक्स्पोलेरेशन अँड कन्सल्टंसी लिमिटेड (एमईसीएल) मध्ये विविध पदांकरिता भरती करण्यात येत आहेत. 'एमसीईएल'मध्ये एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. एमसीईएलने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत ९० हून अधिक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासंदर्भात अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ९४ रिक्त पदांसाठी किमान वयोमर्यादा ३० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ५० वर्षे असून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रु. २४,००० पर्यंत मासिक वेतन देण्यात येईल.

तसेच, अधिसूचनेत म्हटल्याप्रमाणे, निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ०१ वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल परंतु नियुक्ती प्राधिकरणाच्या विवेकबुद्धीनुसार ते वाढवले जाऊ शकतात किंवा बदलले जाऊ शकतात. पोस्टिंगचे ठिकाण कंपनीच्या आवश्यकतेनुसार भारतात किंवा/आणि परदेशात कुठेही स्थित कंपनीचे कोणतेही MECL प्रकल्प/कॉर्पोरेट कार्यालय असेल.

दरम्यान, निवडप्रक्रियेत उमेदवारांची निवड लेखी चाचणी, दस्तऐवज पडताळणी, व्यापार चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रियेसाठी ज्यांना शॉर्टलिस्ट केले आहे त्यांच्याशीच संपर्क साधला जाईल. निवडलेल्या अर्जदारांची यादी MECL च्या अधिकृत वेबसाइटवर करिअर क्षेत्रात उपलब्ध असेल.

ऑनलाइन अर्ज सादर करताना अर्जाची फी रु. १०० असून जे उमेदवार एससी, एसटी आणि माजी सैनिक आहेत किंवा जे विभागीय कर्मचारी आहेत त्यांना अर्ज फी भरण्याची आवश्यकता नाही. अर्जाची किंमत पंजाब नॅशनल बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक चालान वापरून भरली जाणे आवश्यक आहे. दुसरी पेमेंट पद्धत स्वीकारली जाणार नसून ऑनलाइन अर्ज दि. १४ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाले असून १३ सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत बेवसाईट www.mecl.co.in ला भेट द्या.

कार्यकारी पदे

उपमहाव्यवस्थापक (वित्त) ०१ जागा, व्यवस्थापक ०१ जागा, सहाय्यक व्यवस्थापक ०५ जागा, विद्युत अभियंता ०१ जागा, भूवैज्ञानिक १४ जागा, भूभौतिकशास्त्रज्ञ ०५ जागा, केमिस्ट ०५ जागा, खरेदी आणि कंत्राटी अधिकारी ०१ रिक्त जागा, लेखा अधिकारी ०३ रिक्त जागा, प्रोग्रामर ०४ रिक्त जागा, एचआर अधिकारी ०१ जागा, एकूण ४१ जागा

गैर-कार्यकारी पदे

लेखापाल ०६ जागा, हिंदी अनुवादक ०१ जागा, तंत्रज्ञ २५ जागा, सहाय्यक २० जागा, इलेक्ट्रिशियन ०१ जागा, एकूण ५३ पदे

Powered By Sangraha 9.0