सीमा हैदरनंतर प्रियकरासाठी बांगलादेशहून सोनिया अख्तरने गाठलं नोएडा!

22 Aug 2023 18:29:50
Bangladeshi Woman Sonia Akhtar Arrives in Noida With Infant

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सीमा हैदरप्रमाणे आता बांगलादेशच्या सोनिया अख्तरही नोएडात आली आहे. ती सौरव कांत तिवारीच्या शोधात आहे, ज्याने तिच्याशी ढाका येथे कथितपणे लग्न केले होते. मग तिला सोडून तो भारतात आले.सोनिया वैध कागदपत्रांसह भारतात आली आहेत. आपल्या एक वर्षाच्या मुलाला कुशीत घेऊन तिने नोएडा गाठले.सोनिया म्हणाली की तिला तिच्या पतीसोबत राहायचे आहे. तिच्या म्हणण्यानुसार, सूरजपूर, नोएडा येथील रहिवासी सौरव कांत तिवारी याने तीन वर्षांपूर्वी ढाका येथे तिच्याशी लग्न केले होते.

सोनियांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही काळानंतर सौरव तिला सोडून भारतात परतला. दि. २१ ऑगस्ट रोजी तिने या संदर्भात नोएडा पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास एसीपी महिला सुरक्षा विभागाकडे सोपवण्यात आला आहे.ढाका येथे राहणारी सोनिया नोएडाच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तिचा दावा आहे की, १४ एप्रिल २०२१ रोजी तिचे सौरवशी लग्न झाले होते.महिलेने पोलिसांना असेही सांगितले की, सौरव जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ढाका येथील कल्टी मॅक्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत होता. सोनियांनी तिचा आणि मुलाचा पासपोर्ट, व्हिसा आणि सिटीझन कार्डही पोलिसांना दिले आहे.




विशेष म्हणजे,चार मुलांना घेऊन भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण खूप गाजले आहे. PUBG वर नोएडातील रबुपोरा येथील सचिनच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पतीला सोडून ती मुलांसह नोएडाला आली. ती बेकायदेशीरपणे भारतात आली होती. सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारतीय नागरिकत्व देण्याची विनंती करणारा अर्जही पाठवला होता. तुरुंगात आयुष्य घालवणार, पण पाकिस्तानात जाणार नाही, असं तिने म्हटलं होतं. सचिनला तिच्या आयुष्याचे वर्णन करताना तिने सांगितले होते की, तिचा एकच गुन्हा होता की ती नेपाळमार्गे भारतात आली.



Powered By Sangraha 9.0